24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरआमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते वेंटीलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकच चिंता वाढली आहे. आमदार भारत भालके यांच्या उत्तम स्वस्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेकडे प्रार्थना केली जात आहे.

गेली काही दिवसांपूर्वी आमदार भालके यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियाद्वारे उलट सुलट चर्चा सुरू होत्या. यावर आमदार भालके यांचे पुतणे व्यंकट भालके यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार भालके यांच्या प्रकृती विषय अधिकच चिंता वाढली आहे.

दरम्यान साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने रुबी हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी आमदार भालके यांची प्रकृती विषयी माहिती दिली असून त्यांची तब्येत अधिक गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आसल्याचे सांगण्यात आल्याने अधिकच चिंता वाढली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन आ.भालके यांना पाहिले तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येती बाबतची माहिती घेतली आहे. यावेळी स्वतः पवार यांनी मुंबईतील काही तज्ञ डॉक्टरांची आणि येथील डॉक्टरांशी चर्चा घडवून आणली होती.

देशात ८० टक्के लोक मास्क विना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या