17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeसोलापूरआमदार यशवंत माने यांना मराठा बांधवांचा घेराव

आमदार यशवंत माने यांना मराठा बांधवांचा घेराव

मोहोळ शहरवासीयांचा जिल्हा बंदला आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

मोहोळ :  सर्वोच्च न्यालयाने मराठा आरक्षणाला  स्थगिती दिल्यामुळे मराठा बांधवांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.  सोमवार २१ सप्टेंबर रोजी मराठा समाजाने पुकारलेल्या जिल्हा बंद आंदोलनाला मोहोळ शहरवासीयांनी कडकडीत बंद ठेऊन शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी सकल मराठा समाजाकडून आमदार यशवंत माने यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे दोन्ही सरकाराचा तीव्र निषेध व्यक्त करीत सकल मराठा समाज वतीने २१ सप्टेंबर रोजी मोहोळ शहर बंद करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मराठा आंदोलकांनी आसूड ओढत मोहोळच्या शासकीय विश्रामगृहात आमदार यशवंत माने यांना घेराव घातला. यावेळी त्यांना मराठा भागीनींनी निवेदन दिले. यावेळी आ. माने यांनी आपण मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे सांगत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या विधीमंडळात आवाज उठविण्याचे अश्वासन दिले.

यावेळी मराठा समाजातील अनेक जाणकार व्यक्तींनी भाषणाद्वारे मराठा समाजाच्या मनातील आरक्षणा विषयीच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी जमलेल्या आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्कांच…!, एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणंत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शेकडो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ३५ जणांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस दिली. शिवाय सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह ५ अधिकारी, ५० पोलिस कर्मचारी, २० होमगार्ड यांच्यासह पोलीस मुख्यालयाच्या स्टायकिंग फोर्सचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.

मराठा आरक्षण : स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारचा न्यायालयाला विनंती अर्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या