28.6 C
Latur
Tuesday, May 18, 2021
Homeसोलापूरआमदार, खासदार शेतक-यांच्या बांधावर, प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा नवा फंडा

आमदार, खासदार शेतक-यांच्या बांधावर, प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा नवा फंडा

एकमत ऑनलाईन

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर (ता माळशिरस) गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीचा पाऊसाने सर्वत्र थैमान घातले आहे त्यामुळे भीमा, नीरा नदीला महापूर आला होता त्या पुराच्या पाण्याने शेतक-यांची उभी पिके पाण्याने वाहून गेली आहेत. शेतातील माती पाण्याने वाहून गेल्याने त्याचा फटका शेतक-यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

विदर्भ मराठवाड्यात सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा उत्तर सोलापूर अक्कलकोट माळशिरस पश्चिम महाराष्ट्रात तालुक्यातील अतिवृष्टीचा व महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे यामुळे शेतीचे कधीच न भरून येणारे नुकसान झाले आहे त्या नुकसान ग्रस्त शेतीची व पिकाची पाहणी करण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार, यांची जणू स्पर्धाच लागली आहे. आधी मी का तू अशी परिस्थिती सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे.

गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाच्या भितीने घरात बंदिस्त असलेले व्हीडिओ कॉनफरन्स द्वारे बातचीत करणारे मंत्री, आमदार, खासदार आता पुर गस्तीच्या पाहाणीसाठी घराबाहेर पडलेले आहेत तेही थेट शेतक-यांच्या बांदावर आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत आम्हाला शेतक-यांचा किती कळवळा आहे हे दाखविण्याचे काम सत्ताधारी पक्ष, विरोधीपक्ष यांच्या कडून केला जात आहे. शेतक-याचे यांना काहीही देणेघेणे नाही हे फक्त एकमेकांच्या आड लपण्यासाठी चालला हा खटाटोप आहे.

गेल्या सात महिन्यांपासून हे मंत्री, आमदार, खासदार कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडत नव्हते व कोणालाही भेटत ही नव्हते. एखाद्या व्यक्ती काही कामानिमित्त भेटायला गेली तर यांचे पिय सांगतात की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार, खासदार साहेब कोणाला भेटणार नाहीत असे सांगितले जाते. तेच आमदार खासदार मंत्री आज शेतक-यांच्या बांधावर आता नाही का कोरोना व त्याचा प्रादुर्भाव मग आताच कसा शेतक-यांचा एवढा पुळका का आला असावा हे देव जाणे.

खासदार-आमदार मंत्री आता मात्र शेतक-यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला देत आहेत मदत मात्र शुन्य पणकागदावरील घोडे नाचवणे शिवाय यांनी आजपर्यंत काहीच केले नाही. ही वस्तुस्थिती असली तरी लोखोच्या बंगल्यात राहणारे बिस्लरीचे पाणी पिणारे, एसी च्या गाडीत फिरणारे मटणाचे जेवण झाल्यावर बिस्लरीने हात धुणारे महाशय ऐकाकी जमिनीवर कसे काय आले हे फक्त शेतक-यांना, सर्वसामान्य नागरिकांना उल्लू बनवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी चाललेली ही एक खटाटेप आहे. बाकी काही नाही. पण त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ही मात्र नक्की.

सत्ता येण्यापूर्वी प्रत्येक पक्षांकडून आम्ही निवडून आलो की असे करेन आमच्या पक्षाचे सरकार आले तर असे करू तसे करू अशी आश्वासनांची खैरात केली जाते परंतु सत्तेत आल्यावर आश्वासनाची भूल यांना पडते ही वस्तुस्थिती आहे.

पराभवानंतरही दिल्ली प्रथमस्थानी; पंजाबला चार विजयांंची गरज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या