मोहोळ (राजेश शिंदे.) : दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी मोहोळ नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे विकतचे पाणी घेऊन आंघोळ करण्याची वेळ मोहोळ करावं आली आहे . नगरपरिषदेच्या कारभाराबद्दल मोहोळमध्ये एकही नेता अथवा विरोधी पक्षातील नगरसेवक ब्र शब्द काढताना दिसत नाही. आष्टीच्या नदीमध्ये भरपूर पाणी असताना देखील केवळ नगरप्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे सणासुदीच्या दिवशी मोहोळ शहराला पाणीपुरवठा बंद असल्यामुळे हिंदू धर्माचा महत्त्वाचा असणारा दिवाळी सणाच्या पहिल्या आंघोळी दिवशीच पाणी नसल्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की मोहोळ शहराला आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातून सीना नदीच्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे मात्र उजनी जलाशयातून सोडलेले जादा पाणी तसेच सलग तीन चार दिवस झालेला मुसळधार पाऊस यामुळे सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विजेच्या मोटारी खांब ट्रान्सफरमिटर सर्वच पाण्यात होते त्यामुळे आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातून मोहोळ शहराला गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद होता मात्र मोहोळ पुणे रस्त्या जवळील गणपाच्या ओढ्यामध्ये असलेल्या विहिरी मधून मोहोळ शहरातील प्रत्येक भागाला दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता मात्र आता सध्या दिवाळीचा सण आहे आणि या महत्त्वाच्या सणादिवशी मोहोळकरांना पाणी नसल्यामुळे होळकरांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा च्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
येत्या दोन दिवसात सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास नगरपालिके समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश देशपांडे यांनी दिला आहे याबाबत पाणीपुरवठा विभागाला विचारले असता त्यांनी सांगितले की नदीतील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या सर्व मोटारी वीज चा डीपी व इतर सर्वच साहित्य भिजल्यामुळे पाणीपुरवठा बंद केला होता मात्र गेले दोन दिवस या भागातील सर्वच चिखल काढून तो विजेचा डीपी आणि इतर साहित्य जोडण्याचे काम सुरू केले आहे येत्या एक-दोन दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कोंडीबा देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधी बोलताना ही माहिती दिली
नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी चिखल झाला होता त्यामुळे गेले पंधरा पुर ओसरल्याने गेले दहा दिवस संपूर्ण चिखल काढून पाणी पुरवठ्याचा खराब झालेल्या मोटारी विजेचे खांब डीपी ट्रान्सफरमिटर बदलून काम पूर्ण करून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण होईल व पुरेशा दाबाने आणि भरपूर पाणी मिळेल मिळेल
अमीत लोमटे
नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग मोहोळ
पहिल्यांदाच बिहार कॅबिनेट मुस्लिम मंत्र्याविना