सोलापूर : मोहोळ तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत नववीत शिकणा-या अल्पवयीन मुलींचा हात पकडून विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील एका नामांकित खाजगी शाळेत नववीच्या वर्गात शिकणा-या अल्पवयीन मुलींचा सहा जानेवारी रोजी मराठीचा पेपर सुरू असताना पीडित फिर्यादी मुलीच्या बेंच जवळ जाऊन तिचा हात पकडून तिच्या हातातील घड्याळात वेळ बघण्याचा बहाणा करून तिच्याजवळ थांबून वारंवार तिचा हातात हात घेऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर संबंधित मुलीने विचारणा केली असता त्या शिक्षकाने गप्प बस नाहीतर तुझे मार्क कमी करेन अशी धमकी दिली. त्यानुसार पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार शिक्षक सिध्देश्वर बजरंग वागज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा ७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला असून याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.