मंगळवेढा : ब्रह्मपुरी ते मंगळवेढा मार्गावरून निघालेल्या एका मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दि. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत जयानंद तरंगे हे एम एच १३ डी.एल ००४९ या मोटारसायकलवरून ंिनबोणी येथे जात असताना मंगळवेढा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल सुगरणच्या समोर पाठीमागून येणा-या अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात येऊन जोराची धडक दिली. डोक्यास गंभीर मार लागून तो जागेवर मयत झाला आहे. जयानंद लक्ष्मण तरंगे (वय २२, रा. दर्गनहळ्ळी, ता.द. सोलापूर) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची खबर न देता अज्ञात वाहनचालक निघून गेला असल्याची फिर्याद बालाजी म्हारनूर यांनी दिली आहे.