25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeसोलापूरमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दूध दरवाढीसाठी आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दूध दरवाढीसाठी आंदोलन

एकमत ऑनलाईन

रिधोरे : रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हाकार्याध्यक्ष सत्यवान (आण्णा) जाधव व सदाभाऊ खोत यांचे खंदे समर्थकआप्पासाहेब गवळी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरोधात दूधदर वाढी साठी तांदुळवाडी.ता.माढा. जि.सोलापूर येथे आंदोलन चाबुक फोड आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध करण्यात आला. दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांचा निषेध करून महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला चाबुकाने फोडण्यात आले. यावेळी जिल्हाकार्याध्यक्ष (आण्णा) जाधव यांनी दुध उत्पादकांच्या व्यथा मांडल्या,पशुखाद्याच्याकिंमतीत भरमसाठ वाढ झाली अन दुधाच्याकिंमती मात्र घसरल्या, रोज उत्पादीत होणारं दुधाचं हे संकलन केलच जातं आणि त्याचा खप ही आहे शिल्लक दूधाची पावडर तयार केली जाते,भुकटीचे दर आहे तेच आहेत.दुधाची पॅंिकग पिशवीचीकिंमतही तीच आहे.मग दुधाचे भाव पडलेच कसे यामागील करणे शोधली पाहिजेत असेही मत जाधव यांनी मांडले.

दुधाला कायदयाचे संरक्षण देवून कायमस्वरूपी कायदा करून दुधाला हामी भाव दयावा.असे मत दूध उत्पादक आप्पासाहेब गवळी यांनी व्यक्त केल तर भाव वाढ न झाल्यास दुधदरासंदर्भात आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री.शांतिलाल गवळी यांनी दिला.

तर रिधोरे ता.माढा जि.सोलापूर येथे दुधाच्या पडलेल्या दराबाबत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातस चाबूक फोड आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुधाची अंघोळ घालून गाईच्या दुधाला लिटरला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधास लिटरला 50 रुपये दर मिळण्यासाठी या सरकारला लवकर बुद्धी सुचावी यासाठी रयत क्रांती संघटनेकडून एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.लवकर निर्णय नाही घेतला तर भविष्यात आंदोलन उग्र होऊ शकते याची सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा.असा इशारा जिल्हा संघटक बळीराम गायकवाड यांनी दिला.

…लाभला निवांत संग!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या