36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरश्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : वसंत पंचमी दिनी दुपारी बाराच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला.मंगळवारी वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल व रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.यावेळी मंदिरे समिती अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरातील कर्मचारी उपस्थित होते.विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा निमित्त सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली होती. ह-भ-प गहिनीनाथ महाराज औसेकर, विठ्ठल जोशी यांनी देवाच्या लग्नात मंगलाष्टका म्हटल्या.यासाठी मंदिर समितीच्या वतीने विवाहाचे जय्यत तयारी करण्यात आली होती. पाच जण विविध फुलांनी मंदिर सजवण्यात आले होते.

यावेळी विठ्ठलास पांढऱ्या रंगाचा पोषाख आणि रुक्मिणी मातेस पांढर्‍या रंगाची साडी परिधान करण्यात आली होती.दरवर्षी देवाचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावून देवाचा शाही विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवता परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.

वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला पांढरा पोशाख परिधान केला जातो. आज देवाला पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करण्यात आला होता.तर रुक्मिणी मातेला पांढर्‍या रंगाची साडी परिधान करण्यात आली होती. सोहळ्याच्या निमित्ताने अनुराधा शेटे यांच्या अमृतवाणीतून रुक्मिणीस्वयंवर कथेचे निरूपणही झाले. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विविध आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवले होते.

पुणे येथील भारत भुजबळ या भाविकांनी आकर्षक फुलांची सजावट केली होती. यामध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, आष्ट्र, मोगरा, गुलछडी, बिजली, जरबेरा, कार्निशन, घोडापत्ती, सीतावेल, ग्लाॅडिया आशा २६ प्रकारच्या विविध प्रकारच्या फुलांनी देवाच्या गाभारा, मंदिर आणि सभामंडप सजवण्याचा आले होते. दरवर्षी देवाचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावून देवा चा शाही विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवतात परंतु या वर्षी कोरोनाचे संकटात असल्याने मोजक्याच भाविक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत देवाचा विवाह सोहळा साजरा संपन्न झाला.

दिव्यांगांच्या साहित्य वाटपासाठी ‘तारिख पे तारीख’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या