22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरमुंगशीत पत्नीवर सुरीने वार, पतीवर गुन्हा

मुंगशीत पत्नीवर सुरीने वार, पतीवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

बार्शी : लोकांकडून तुम्ही पैसे का घेता असे पत्नीने विचारल्याने चिडून जाऊन पतीने तिला सुरीने मारहाण करून जखमी केल्याची घटना बार्शी तालुक्यात मुंगशी (आर) येथे २८ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जया सोमनाथ भोसले यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

२८ जुलै रोजी रात्री फिर्यादी जया यांनी पती सोमनाथ भोसले यास तुम्ही लोकांकडून हातउसने पैसे का घेता ? असे विचारले. त्याचा राग मनात धरून आरोपीने स्वतःच्या पत्नीस शिवीगाळी करून घरात असलेला मटन कापण्याचा सुरा घेऊन जयाच्या उजव्या हातावर मारला. त्यानंतर आरोपीने घरातील काठीने मारून तिला जखमी केले. याबाबत सोमनाथ पौळा भोसलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार जयंत पेठकर करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या