22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरगुंठेवारीला मुदतवाढीचा मनपा प्रशासनाचा निर्णय

गुंठेवारीला मुदतवाढीचा मनपा प्रशासनाचा निर्णय

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरातील हद्दवाढ भागात गुंठेवारीच्या मोठ्या प्रमाणावर जागा असून त्याला परवानगी न दिल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठा फरक पडत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्या. या पाश्र्­वभूमीवर अतिरिक्­त आयुक्­त विजय खोराटे यांनी गुंठेवारीला रितसर परवानगी घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे

गुंठेवारीवर जागा विकत घेऊन त्या जागेवरील बांधकाम परवाने शासन निर्णयानुसार महापालिकेने देणे बंद केले होते. त्यामुळे हजारो मिळकतींवरील बांधकामे ठप्प झाली आहेत. या पाश्र्­वभूमीवर संबंधित बांधकामांना परवाना द्यावा, अशी मागणी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनीही पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली होती. त्या निर्णयाने महापालिकेला काय फायदा होईल, नागरिकांच्या अडचणी काय आहेत, याची माहिती पटवून दिली.

त्यानंतर आयुक्­तांनी गुंठेवारीवरील बांधकामांना नियमित परवाना देण्याचा निर्णय घेतला. उशिरा का होईना आयुक्­तांनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. या निर्णयातून महापालिकेला करातून मोठी रक्­कम मिळणार आहे. आगामी बजेटमध्ये त्याचा विकासकामांसाठी लाभ होईल, असा विश्­वास सत्ताधा-यांनी व्यक्­त केला आहे. दरम्यान, शहरातील करदात्यांकडील प्रलंबित बिलांची पावती घरोघरी पाठवावी.

गाळे धारकांकडून नवीन निर्णयानुसार टॅक्­स घ्यावा, करवसुली करताना त्यांना सवलत द्यावी. प्रशासनाने कोणतीही करवाढ करू नये, अशीही मागणी शिवानंद पाटील यांनी यावेळी केली 2001 च्या शासनाच्या निर्णयानुसार गुंठेवारीला परवानगी देण्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून बंद होती. आता त्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. संबंधितांना महापालिकेकडे अर्ज करून त्याची रितसर परवानगी घेता येईल, असे मनपा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या