22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरमनपा प्रशासनाची रुग्णांना जनावरांसारखी वागणूक

मनपा प्रशासनाची रुग्णांना जनावरांसारखी वागणूक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सिंहगड क्वारंटाईन सेंटर लगबगीनं बंद करुन सक्तीने तेथील रुग्णांना महिला प्रशिक्षण केंद्रात आणणे पालिका व्यवस्थापनाच्या अंगलट आले. आजारपणाच्या काळात प्रशासनाने रुग्णांची सोय करायची की गैरसोय असा जाब विचारत आज सकाळीच गदारोळ केला. यानंतर पालिका विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांनी क्वारंटाईन सेंटर येथे जावून व्यथा जाणल्या आणि या रुग्णांना परत सोयीच्या सिंहगड सेंटरमध्ये पाठविणे प्रशासनाला भाग पाडले. महानगरपालिका कोरोना काळात अनेक मुद्यांवर बेफिकीरपणे वागत आहे. काल लॉकडाऊन संबंधातील सुधारीत आदेश रात्री उशीरा काढले, ते वाचून अनेकांना नक्की काय आदेश आहेत हे ही समजले नाही.

एका पाठोपाठ एक आदेश काढणे यामुळे नागरिकांना, रुग्णांना काय त्रास होतो याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात नाही. असाच एक नमुना काल रात्री पुन्हा घडला. पालिकेतील वरिष्ठ अधिका-यांच्या सांगण्यावरुन सिंहगड क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय झाला. येथे १३० वर रुग्ण आहेत. तिथे तुलनेत चांगल्या सुविधा आहेत. महिला प्रशिक्षण केंद्रातही १०० वर रुग्ण आहेत. एकाएक सिंहगड क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा तुघलकी आदेश निघाला. एवढ्या लोकांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोय होईल की नाही हे ही पाहिलं गेलं नाही. त्यांना घाईघाईनं तिकडे धाडण्यात आले. काही जणांनी नकार दिला तेंव्हा पोलीस फोर्सचा वापर करण्यात आला, अशी तिव्र प्रतिक्रिया येथील महिलांनी दिली.

यासंबंधातील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत झाल्यानंतर तातडीने विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी क्वारंटाईन सेंटर गाठलं. रुग्ण महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता गृहांचा अभाव, स्वच्छतेचा अभाव जेवण अगदीही चहाही वेळेवर मिळत नाही अशी स्थिती दिसून आली. एकाच खोलीत अनेकजणांना ठेवण्यात आलं आहे. शिंदे यांनी ही बाब अधिका-यांना बोलवून निदर्शनास आणली. सिंहगड सेंटर घाईघाईने बंद करण्याचा कारण काय? असा जाब विचारला. जोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत या सर्वांना पुन्हा सिंहगड सेंटरमध्ये पाठवायला लावले.

मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करणार
महापालिकेच्या ज्या अधिका-यांनी मनमानी कारभार करत रुग्णांना हलवण्याचे आदेश काढले त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.
– अमोल शिंदे (मनपा विरोधी पक्षनेता)

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन’ : उमाळा आणि उबळसुध्दा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या