22 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरगोंधळामुळे मनपा सभा तहकूब

गोंधळामुळे मनपा सभा तहकूब

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तीन महिन्यानंतर सोलापूर महापालिकेची बुधवारी प्रत्यक्ष उपस्थिती मध्ये मनपा सभागृहात सभा झाली मात्र गोंधळ.. माइक फोडणे…घोषणाबाजी… महापौरांनी गोंधळात सभा गुंडाळणे आणि विरोधकांनी घोषणाबाजी देत महापौरांना अडविणे अशा पद्धतीने ही सभा तहकूब करण्यात आली त्यामुळे सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी बाबतचा बहुचर्चित विषय पुन्हा लांबणीवर पडला आहे. सोलापूर महापालिकेची मार्च आणि एप्रिल महिन्याची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी कौन्सिल हॉल मध्ये आयोजित केली होती या सभेमध्ये हद्दवाढ भागातील मिळकतींचा सर्वे करण्यासाठी शासनाकडे नऊ कोटी रुपये भरण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

जिल्हास्तर नगरोत्थान अभियानातून सोलापूर महापालिकेला मिळालेल्या अनुदानातून सर्व नगरसेवकांना समसमान निधी मिळावा याच विषयावरून विरोधकांनी भाजपला घेरले त्यातच सुरेश पाटलांनी स्वत:च्या पक्षातीलच पदाधिका-यांची खरडपट्टी केली विरोधकांनी सुरेश पाटील यांच्या भाषणावर टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली मात्र अशा गंभीर वातावरणात महापौरांनी सभा तहकूब केली त्यामुळे विरोधकांनी महापौरांना सभा गृह सोडून जाताना जवळपास दहा मिनिटं अडवून ठेवलं आणि घोषणाबाजी केली. ब-याच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना आता सिटीसर्वे चे उतारे मिळतील कारण सोलापूर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हद्दपार भागाचा सिटीसर्वे करण्यासाठी 9 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

महापालिकेतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे महापालिका नऊ कोटी रुपये शासनाच्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे भरेल त्यानंतर सिटीसर्वे चे काम सुरू होईल व नागरिकांना मिळकतीचे सिटीसर्वे उतारे तसेच प्रॉपर्टी कार्ड देखील मिळतील अशी मते अनेक नगरसेवकांनी उपस्थित केली याबाबत नगरसेवक बाबा मिस्त्री आनंद चंदनशिवे गुरुशांत धुत्तरगावकर अमोल शिंदे चेतन नरोटे तोफिक हत्तुरे श्रीनिवास करली आदींनी भाष्य केले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपावरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या सुरेश पाटील यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केल्याचं दिसून आलं त्यांनी निधी वाटपा दरम्यान नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना निधी दिला गेला नाही त्यांच्यावर अन्याय का असा सवाल महापौरांना केला तेव्हा महापौरांशी सलगी करणा-या श्रीदेवी फुलारे यांना हे बघवले नाही त्यांनी उलट सुरेश पाटलांना ओ अण्णा आमच्यात भांडणे लावू नका अशा शब्दात सुनावत निधी मिळाल्याचे सांगितले.

लॉकडाऊन संपला… तसा पानविडा रंगला…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या