26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरआगळगाव रोडवर भरदिवसा निवृत्त शिक्षाकाच्या डोक्यात दगड घालून खून

आगळगाव रोडवर भरदिवसा निवृत्त शिक्षाकाच्या डोक्यात दगड घालून खून

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव्) : बार्शी तालुक्यातील कळंबवाडी येथील निवृत्त शिक्षक त्रिंबक उपाम निवृत्त झाल्यावर आपल्या बायकामुलासह गावाकडे शेती करून राहत होते.फिर्यादी मूलगा गणेश त्रिंबक उमाप वय २३ वर्षे रा. कळंबवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडील त्रिंबक,आई इंदुमती व आत्त्या लताबाई नलवडे एकत्र राहून वडीलांची पेंशन आणि दहा एकर शेती करून गावी राहत होतो.दि.२२ ऑक्टोबर दुपारी १:३० वाजताच्या सुमारास मार्केट यार्डमधून उडीदाची पट्टी घेऊन येतो म्हणून सांगून गेले.

त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या आसपास मुलगा गणेश यास फोन आला व उंबरगे ते आगळगाव रोड वरील हायस्कूलच्याजवळ आगळगाव शिवारात आरोपी बिभिषण विश्वनाथ उमाप व त्याचा त्याचे वडील विश्वनाथ बाबू उमाप यांच्याशी जोराचा वाद सुरु असल्याचे गणेशला त्याच्या चुलत भावाने सांगितले.त्यावेळी आपल्या जन्म दिलेल्या बापाला मारताहेत हे ऐकून जीव मुठीत धरून गणेश आपल्या वडिलांजवळ पोहोचला त्यावेळी वरिल दोन्ही इसम हे त्रिंबक उमाप यांच्या अंगावर बसून मारत असल्याचे दिसले.मुलगा गणेश आल्याचे पाहून दोन्ही इसमांनी तेथून पळ काढला.

गणेशच्या वडिलांना मारत असताना काही जणांनी सोडवायचा प्रयत्न केला मात्र जो कोणी सोडवायला येईल त्याचीही आम्ही विकेट उडविल्याशिवाय राहणार नाही असा दम दिल्यामुळे गणेशच्या वडिलांचे प्राण कोणीच वाचवू शकले नाहीत.मुलगा गणेश ज्यावेळी त्रिंबक उमाप यांच्याजवळ पोहोचला त्यावेळी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत होऊन रक्त वाहत होते,उजव्या डोळ्याला व ओठाजवळही लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना गणेश याने वडिलांना पिकअपमध्ये बसवून दवाखान्यात आणले परंतू दवाखान्यात घेऊन येण्याच्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले.त्यानंतर मुलगा गणेश उमाप याने बिभीषण विश्वनाथ उमाप व विश्वनाथ बाबू उमाप रा.कळंबवाडी यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गु.र.नं.व कलम- ३५०/२०० भादंवि कलम ३०२,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिल दोन्ही आरोपींना अटक केले असून पुढील तपास सपोनि जायपत्रे हे करीत आहेत.

राज्यसरकारचा मोठा निर्णय ; अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या