23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeसोलापूरसोलापूर सिव्हीलमध्ये रूग्णाकडून रूग्णाचा खून

सोलापूर सिव्हीलमध्ये रूग्णाकडून रूग्णाचा खून

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरातल्या श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयामध्ये एका रुग्णाने सलाईनच्या रॉडने मारहाण करुन दुस-या रुग्णाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून उपचारादरम्यान ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक मध्ये गेल्या काही महिन्यापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या ७० वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले. याच वॉर्डात फुफ्फुसाच्या विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला दाखल करण्यात आले होते.

सोमवारी रात्री याच युसूफ पिरजादेने वृद्धाला सलाईनच्या रॉडने मारहाण केली, यात तो जखमी झाला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सिव्हिलमध्ये अस्वच्छता, एकाच वार्डात गर्दी यातून रुग्णांमध्ये वादविवाद होतात त्यातील हा प्रकार असावा असं ठिकाणी काम करणा-यांच म्हणणं आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या