32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरअनैतिक संबंधातून मुलीने केला आईचा खुन

अनैतिक संबंधातून मुलीने केला आईचा खुन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पतीच्या निधनानंतर एकटी राहणा-या सासूचे जावया सोबत अनैतिक संबंध जुळले. आईने जावया सोबत अनैतिक संबंध ठेवल्याने मुलीने दिरासोबत अनैतिक संबंध ठेवले या दिरासोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध करणा-या आईला मुलीसह मुलीच्या प्रियकराने संपवले. तोरवी (विजापूर, कर्नाटक) येथे राहायला होती मुलगी. रात्रीत खुन करून मुलगी व तिचा प्रियकर झाले होते पसार. मयताची नणंद कविता भोसले यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दाखल केली होती. लक्ष्मीबाई माने यांचा खुन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सपोनि. शितलकुमार कोल्हाळ यांनी दोन दिवसात लावला प्रकरणाचा छडा.

पती-पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा लक्ष्मीबाई माने यांचा सुखाचा संसार सुरू होता मात्र पाच वर्षापूर्वी पतीचा आकस्मित मृत्यू झाला त्यानंतर एका मुलीचाही मृत्यू झाला. दुस-या मुलीचा कर्नाटकातील तोरवी येथे विवाह झाला. तिच्या सोबत राहायला भाऊ ही गेला. एकटया राहणा-या लक्ष्मीबाईंचे अनैतिक संबंध जावयासोबत जुळले. त्याची माहिती मुलीला मिळाली आणि मुलीने तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध ठेवले. आईने त्यास विरोध केल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईलाच संपविल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सोलापूरातील कुमठे परिसरातील महालक्ष्मी नगरात राहणा-या लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाल्याची खबर त्यांची नणंद कविता भोसले यांना समजली असता त्यांनी घरी धाव घेवून पाहणी केली.

खुनाचा संशय आल्याने त्यांनी विजापूर नाका पोलिसात खबर दिली. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वपोनि उदयसिंह पाटील , सपोनि. शितलकुमार कोल्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा खुन अनैतिक संबंधातून झाला असावा असा पोलिसांना संशय आला. त्यांनी शेजारील व्यक्तीकडून माहिती घेतल्यानंतर लक्ष्मीबाईच्या मृत्यू आदल्या दिवशी त्यांची मुलगी व दिर घरी आल्याचे समोर आले. त्यानंतर कोल्हाळ यांचे पथक तोरवी येथे पोहोचल व पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. सोमवारी ता. १६ त्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या