21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरविवाहितेचा खून; आरोपीचा जामीन फेटाळला

विवाहितेचा खून; आरोपीचा जामीन फेटाळला

एकमत ऑनलाईन

बार्शी : चारित्र्याच्या संशयावरून व जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून रुकसार अलीम मुलाणी (२८, रा. उपळाई रोड, बार्शी) या महिलेचे नाक, तोंड व गळा दाबून खून केल्याच्या आरोपात आरोपी ख्वाजू उर्फ रिहान सलिम मुलाणी (वय २४, रा. पठाण गल्ली, सांगोला) याचा जामीन अर्ज बार्शीचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एल.एस. चव्हाण यांनी फेटाळून लावला.

८ एप्रिल, २०२१ रोजी रात्री शहरात गाडेगाव रस्त्यावर विवाहितेच्या घरी ही घटना घडली. या प्रकरणी मयत विवाहितेची आई जुबेदा म हुसेन खान ( वय ६०, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी रिहान मुलाणी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

मयत विवाहिता रुकसार अलीम मुलाणी हिचे दहा वर्षांपूर्वी अलिम नजीर मुलाणी (रा.बार्शी) यांच्याशी पहिला विवाह झाला. त्यांना दोन मुले झाली, परंतु पती काही काम करत नव्हता, दारूचे व्यसन होते. बायकोवर संशय घेत होता. कंटाळून ती माहेरी आईकडे राहायला आली होती.

तीन महिन्यांपूर्वी सांगोला येथे काम करण्यासाठी गेली असता, तेथे तिचे रिहान मुलाणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तो ट्रक चालक आहे, त्याने मुलांना संभाळतो, असे सांगून दुसरा प्रेमविवाह केला आणि ते बार्शी येथे उपळाई रोडवर राहू लागले. ८ एप्रिल रोजी जेवणाच्या कारणावरून दोघांत वाद झाला. या प्रकारानंतर रुकसार हिने आईशी संपर्क साधून रिहान हा फोन वापरू देत नाही, संशय घेत असल्याचे सांगितले. आईने येऊन वाद मिटवून त्या परत घरी गेल्या.

९ एप्रिल रोजी सायंकाळी तिची आईही मुलीकडे परत गेली असता, बाहेरून कडी लावल्याचे निदर्शनास आले. कडी उघडून आत डोकावताच मुलगी रुकसार किचनमध्ये पडलेली व तिच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. तिला दवाखान्यात नेताच, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिच्या आईने रिहान मुलाणीविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. या घटनेनंतर संशयित आरोपी रिहान मुलाणी हा फरार झाला होता. त्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहायक पोलीस निरीक्षक वरपे यांच्या पथकाने चालवला. या दरम्यान त्याला पोलिसांनी अटक केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या