25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरअनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीचा खून

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीचा खून

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा ऊस तोडणाऱ्या कोयत्याने खून केला. दुधनी स्टेशनवरून रेल्वेने तो सोलापूरकडे निघाला आणि होटगीत उतरून जोडभावी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. दोघांचा विवाह ३० सप्टेंबरलाच झाला होता. त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडली.

ही घटना रुद्देवाडी (ता. अक्कलकोट) येथील उसाच्या फडाजवळ दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. गणेश तुळशीराम उपाडे (वय २८, रा. रेवली, ता. परळी, जि. बीड) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. यात शितल गणेश उपाडे (वय २५, रा. रेवली, ता. परळी, जि. बीड) असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीला सोमवारी अक्कलकोट येथील कोर्टासमोर उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मारूती रेवप्पा पुजारी यांच्या शेताच्या बांधालगत रुद्देवाडी या ठिकाणी आरोपी गणेश उपाडे याने पत्नी शितलवर अनैतिक संबंधांच्या कारणावरून कोयत्याने वार केला. याबाबत फिर्याद पोना नबीलाल मियावाले यांनी दिली आहे.

घटनेच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, हवालदार अजय भोसले, अल्ताफ शेख, नबीलाल मियावाले यांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.

शितल व गणेश यांचा विवाह दि. ३० सप्टेंबर रोजी झाला होता. ऊसतोड सुरु झाल्यानंतर दोघे इतर सहकाऱ्यांसमवेत अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडीला आले. अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला. तो तेथून दुधनी स्टेशनवरून रेल्वेने अक्कलकोटला जात होता. तो चुकून अक्कलकोट स्टेशनऐवजी होटगी स्टेशनवर उतरला आणि तेथून टमटमने सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गेला. जोडभावी पेठ पोलिसांनी त्यास अक्कलकोट पोलिसांच्या ताब्यात दिले.

मृतदेहाचे विच्छेदन अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. रविवारी रात्री ११ वाजता मृताचे नातेवाईक आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले. तेव्हा टोळीतील मुकादम यास आमच्यासमोर आणा. तेव्हा आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असे म्हणत गोंधळ सुरू केला. पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ सुरू होता. रात्रीच नातेवाईक सोलापूर येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथे त्यांना समजावून सांगून परत पाठवण्यात आले. पहाटे ४ वाजता मृतदेह ताब्यात घेऊन गावी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या