24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमसोलापुरात युवकाचा खून

सोलापुरात युवकाचा खून

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मुळेगाव रोडवरील गंगाई केकडे नगरात मध्यरात्री दीडच्या दरम्यान एका ३५ वर्षीय इसमाचा खून झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, केकडे नगरातील रहिवासी कोकणे यांच्या घरात मयत माधू नारायणकर हे भाड्याने रहात होते. मटक्याच्या पैशावरून हा घातपात झाल्याची चर्चा होत होती.

मंगळवारी (ता. २०) नारायणकर हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते.
मध्यरात्री दीडच्या दरम्यान त्यांना एक फोन आल्याने ते उठून घराच्या बाहेर गेले, याच दरम्यान अनोळखी इसमाने येऊन त्यांचा गळा आवळला आणि धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.

आपला पती बाहेर का गेला हे पाहण्यासाठी म्हणून पत्नीने बाहेर येऊन पाहिले असता पती हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. पत्नीने आरडाओरडा केल्याने शेजारी जमा झाले, त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रीती टिपरे यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या