सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला झालेल्या आपघाताबाबत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी फोनद्वारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना दिली. त्यानंतर तात्काळ त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी प्रा काकासाहेब कुलकर्णी यांच्या दूरध्वनीवरुन सुचना देत अपघातग्रस्ताना तात्काळ मदत करण्याच्या सुचना दिल्या.
तसेच शासकीय मदत देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलून मदत द्यायला लावू असेही आश्वासन दिले. तसेच प्रशासनाला सुचना देत सर्वतोपरी मदत करण्याचे सुचना दिल्या. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रा काकासाहेब कुलकर्णी हे लक्ष ठेवून आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे सोलापूरवर लक्ष असल्याचे दिसुन आले.
दरम्यान अक्कलकोट येथील ट्रॉमा केअर सेंटर बाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन ते तात्काळ सुरू करण्या बाबत मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जर ट्रॉमा केअर सेंटर अक्कलकोट मध्ये सुरू असते रुग्णांना सोलापूरला आणण्याची गरज भासली नसती. त्यामुळे अक्कलकोटचे ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ सुरू व्हावे अशी आग्रही मागणी ही महाराष्ट्र प्रदेशकॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली.