18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसोलापूरराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांचा निषेध करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात आला, यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अंदाधुंद वक्तव्य करण्याचा विकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सामजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. बेताल वक्तव्य करणा-या कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली आहे.

यावेळी व्यसनमुक्ती सेलचे ज्योतिबा गुंड, निशांत सावळे, संपन्न दिवाकर, रुपेश भोसले, अक्षय जाधव, मुसा अतार, बिरप्पा बंडगर, मयूर रचा, संदीप साळुंखे, श्रवण ढवलगे, सचिन चलवादी, लखन गावडे, महेश कुलकर्णी, गणेश छत्रबंद, कुमार हलकट्टी, विशाल सावंत, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या