35.2 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeसोलापूरएनसीसीच्या विद्यार्थ्यांनी घेतली लढाऊ विमानांची माहिती

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी घेतली लढाऊ विमानांची माहिती

एकमत ऑनलाईन

सोलापूर : वार बुधवार सकाळी सव्वाआठची वेळ.. आकाशात विमानांचा आवाज ऐकू येत होता. कधी नव्हे तो आवाज मोठा जाणवत होता.. विमानतळ परिसरातील रहिवाशांचे डोळे आकाशाकडे लागलेले. भले मोठे विमान पाहून रहिवासीही आश्चर्यचकित झाले. एकामागून एक येणारी तीन विमानं सोलापूर विमानतळावर दाखल झाली. एनसीसीच्या पोरांनी विमानांची माहिती जाणून घेतली अन् हम हैं तयारच्या जयघोषात ५६ इंच छाती केली.

भारतीय सशस्त्र दलातील लष्करी नेत्यांची निर्मिती करण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ, नॅशनल डिफेन्स अकादमीने अकादमीच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीवर प्रकाश टाकणारे वर्षभर उत्सवाचे नियोजन केले आहे.

७५ ग्लोरियस इयर्स ऑफ सेलिब्रेशननिमित्त “फोर्जिंग जॉइंट मिलिटरी लीडरशिप या थीमचा एक भाग म्हणून, एनडीएमधील एअर फोर्स ट्रेनिंग टीमच्या दोन सुपर डिमोना विमान सोलापुरात दाखल झाली होती. ज्यामध्ये भारतीय हवाई दलाचे भावी लढाऊ विमानचालक होते. यावेळी एनडीएचे कॅडेट आणि प्रशिक्षक यांनी सोलापूर येथे एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधला. त्यानंतर ती विमानं बिदरकडे रवाना झाली.

एनडीएमधील एअर फोर्स ट्रेनिंग टीमची दोन सुपर डिमोना विमाने सोलापुरात दाखल झाली होती. सकाळी ८.३० ला ती सोलापुरात दाखल झाली होती, तर १०.३० वाजता त्यांनी परतीच्या दिशेने उड्डाण घेतले. यामध्ये भारतीय हवाई दलाचे भावी लढाऊ विमानचालक होते. विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने लेफ्टनंट व बटालियनच्या स्टाफनी मार्गदर्शन केले.

सोलापुरात दाखल झालेली दोन विमाने व एक मोठे विमान युध्दात मदत करणारे होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नपुरवठा करणे, औषो घेऊन जाणे, शिवाय अपघात, हल्ल्याप्रसंगी जखमी सैनिकांना उपचारासाठी हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. सोलापुरात आलेली विमाने उडी सेक्टरमध्ये वापरलेली विमाने होती.

सोलापुरातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंटकडून युध्दजन्य परिस्थितीमध्ये नेमके काय चालते, ही विमाने कशी मदतीसाठी धावून जातात ? यात किती लोक, किती साहित्य बसते, मदतकार्यासाठी कोणकोणते साहित्य या विमानात असतात यासह आदी माहिती जाणून घेतली. यावेळी हिराचंद नेमचंद, दयानंदचे एनसीसीचे विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी १२ लोक आले होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या