26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सदाभाऊ खोतांविरोधात आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सदाभाऊ खोतांविरोधात आक्रमक

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
शरद पवार यांच्यावर केतकी चितळे याने केलेल्या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा गोंधळ उडाला आहे. केतकी चितळे यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोलापुरातील राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी अचानकपणे शासकीय विश्रामगृह येथे येऊन सदाभाऊ खोत यांसमोर ंिधगाणा घातला आहे.यामुळे सात रस्ता येथील रेस्ट हाऊस मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता.पोलिसांची एकच धावपळ झाली होती.

सदाभाऊ खोत येत सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग सहित शासकीय विश्रामगृहात घुसले, सदाभाऊ खोत ज्या रूम मध्ये बसले होते त्याठिकाणी जाऊन त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली . टाळमृदंग वाजवत हे पांडूरंगा सदाभाऊ खोत यांना सद्बुद्धी दे असे म्हणून कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला.उपस्थित असलेल्या पोलिसांनी अडवले तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा समोरच निषेध नोंदवत त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या