24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरचंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

एकमत ऑनलाईन

सोलापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या, असे म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूरसह राज्यभर आंदोलने केले. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने पाटील यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

खा. सुळे यांच्याविरोधात वक्तव्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटील यांच्याविरोधात माहिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. दुसरीकडे, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी राज्यभर आंदोलने केले. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पोस्टरला जोडे मारले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, शहराध्यक्ष सुनिता रोटे, लता ढेरे, मनीषा नलावडे, मंगला कोल्हे, लता फुटाणे, शशिकला कसपटे, मनीषा माने, प्रदेशच्या सायरा शेख यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या