करमाळा : रस्त्याचा निकाल माझ्या बाजूने लागणार आहे, तुला काय करायचे ते कर असे म्हणत दगडाने मारहाण केली असल्याचा प्रकार गूळसडी येथे घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हरी विठ्ठल खंडागळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रेवनाथ भैरू यादव (रा. भोसले वाडी, यवत, ता. दौड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यादव व मारहाण करणारे संशयित आरोपी खंडागळे यांची एकमेकांशेजारी शेती आहे. खंडागळे यांनी तहसीलदारांकडे रस्त्याची मागणी केली आहे. त्यावरून तहसीलदार हे रस्ता पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी करून ते गेल्यानंतर काही वेळातच खंडागळे यांनी रस्त्याचा निकाल माझ्या बाजूने लागणार आहे तुला काय करायचे ते कर असे म्हणत दगडाने मारहाण केली असे खंडागळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.