28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeसोलापूरकोणतेही गैरकामकाज केलेले नाही

कोणतेही गैरकामकाज केलेले नाही

एकमत ऑनलाईन

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील संबंधित जमीन ही मूळ मालकाला परत द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. महसूल अधिका-यांनी याची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे होते, त्यानुसारच आम्ही कारवाई केली असे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले.

निकम म्हणाले, उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या निकालाचा दाखला देऊन १९९७ चे आदेश स्पष्टपणे तत्काळ कारवाई करा असे आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तत्कालीन अधिका-याने केलेली नाही. या विषयामध्ये लक्ष घालून आम्ही कामकाज केले. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली म्हणजे भ्रष्टाचार होत नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. तक्रारदाराला अपील करण्याची तरतूदही नियमात आहे. आम्ही केलेले कामकाज हे कायद्याच्या चौकटीतच राहूनच केले आहे. कोणतेही गैरकामकाज केलेले नाही. मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. सोलापूरची जनता हे बघते आहे. काही ठरावीक लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कदम यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी काही रिपोर्ट पाठविला असेल तर त्या बाबतीत न्यायिक बाबी तपासल्या जातील. राज्यभरातील तहसीलदार आणि प्रांताधिकारी एका महिन्यात ३० ते ४० निकाल देत असतात. ते कुणाच्या तरी विरोधात किंवा कुणाच्यातरी बाजूने जात असतात. जेव्हा आम्ही निकाल देत असतो, तेव्हा आमच्या आदेशाला अपिलाची तरतूद आहे, असेही निकम यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या