23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरदारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात तलवार घातली

दारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात तलवार घातली

एकमत ऑनलाईन

सांगोला : दारू पी नाहीतर दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्राला शिवीगाळ करीत तलवारीने पाठीमागून डोक्यात व कपाळावर मारून गंभीर जखमी केले.

शनिवार, २५ जून रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास लोटेवाडी येथील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली. याबाबत समाधान उत्तम लवटे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गोविंद रवींद्र सावंत (रा. लोटेवाडी, ता. सांगोला) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सांगोला तालुक्यात लोटेवाडी येथील समाधान लवटे व रावसाहेब लवटे हे दोघे मिळून शनिवारी सायंकाळी गावातील मारुती मंदिरासमोर गप्पा मारत बसले होते. दरम्यान गावातील ओळखीचा गोविंद सावंत हा दारू पिऊन त्यांच्याजवळ आला. तु माझ्याबरोबर दारू पिण्यासाठी का येत नाही, नाहीतर मला दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणू लागला. यावर समाधानने स्वत: दारू सोडली असून दारू पिण्यासाठी पैसे देणार नाही म्हणताच गोविंदने त्याला शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्याची गच्ची पकडली. त्याने त्याला ढकलून दिल्यानंतर दोघात वादावादीचे हाणामारीत रूपांतर झाले.

त्यांने एवढ्यावरच न थांबता घरी जाऊन तलवार आणून घराकडे निघालेल्या समाधानच्या डोक्यात पाठीमागून मारून जखमी केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोविंद माघारी फिरला असता त्याने त्याच तलवारीने त्याच्या कपाळावर मारले. तो पुन्हा मारत असताना समाधानने त्याचा डावा हात आडवा केला असता अंगठ्यालाही मार लागला. त्याच्या डोक्यातून होणारा रक्तस्राव पाहून गोविंदने तेथून पळ काढला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या