27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरआज ना. गडकरी यांच्या हस्ते महामार्गांचे लोकार्पण

आज ना. गडकरी यांच्या हस्ते महामार्गांचे लोकार्पण

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर ते विजयपूर, सोलापूर ते मंगळवेढा, वाटंबरे- मंगळवेढा, अक्कलकोट या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांचे लोकार्पण सोमवारी केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महाराष्ट्र शासनाचा सार्वजनीक बांधकाम विभाग यांच्या वतीने सोमवार, २५ एप्रील २०२२ रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर आढेगाव जंक्शन येथे भुयारी मार्ग बांधणे (२ कि.मी.,किंमत ४४ कोटी २६ लाख• सोलापूर विजयपूर महामार्गावर छोटा पूल बांधणे,किंमत ३ कोटी ९५ लाख• सोलापूर-हैदराबाद महार्गावरील जमखंडी पूल येथे छोटा पूल बांधणे,किंमत २ कोटी ६८ लाख• सोलापूर विजयपूर ते हैदराबाद रस्ता जोड चौपदरीकरण ३.३९ किलोमीटर,किंमत २९ कोटी १२ लाख, मोहोळ कुरुल कामती कणबस आचेगाव वळसंग-धोत्री-मुस्ती-तांदूळवाडी व वळसंग, ंिदडूर, धोत्री रस्ता व मजबुतीकरण करणे २६.६१० किमी,किंमत ५४ गडकरी यांच्या हस्ते होत आहे. कोटी ७ लाख, सोलापूर शहर ते विजयपूर रोड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, १० किमीकिंमत २९ कोटी ६४ लाख आदी कामाचे लोकार्पण होत आहे.

यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते १६४ कोटी रुपये किमतीच्या ४२ कलोमीटर लांबीच्या सहा महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. तसेच ८ हजार १७ कोटी रुपये किमतीच्या २५० किलोमीटर लांबीच्या चार महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कर्नाटक राज्याचे न आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री उमेश कट्टी यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय सोलापूर आणि विजयपुरजिल्ह्यातील सर्व खासदार- आमदार आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. विजयपूर रोडवरील शासकीय क्रीडा मैदान, नेहरूनगर, सोलापूर ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी नियोजनाच्या कामात व्यस्त आहेत. विजापूर रोडवरील नेहरूनगर मैदानावर या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, सुमारे अडीच हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

सहा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि चार महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण कार्यक्रम थाटात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी, नेहरूनगर मैदानाच्या शेजारी असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम प्रशाला शाळेच्या मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नेहरूनगर मैदानाच्या समोरच असलेल्या विजापूर रोडवरील जागृती विद्यामंदिर शाळेच्या मैदानावरही दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची पार्किंगची यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर आणि विजयपुर जिल्ह्यातील महामार्गांचे जाळे अधिक मजबूत, सुरक्षित आणि विकसनशील करणा-या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या