26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरपरिवहन उपक्रम डिझेल अपहार प्रकरणी १६ जणांना नोटीसा

परिवहन उपक्रम डिझेल अपहार प्रकरणी १६ जणांना नोटीसा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये २०१६-१७ या कालावधीत १० हजार लीटर डिझेलच्या खरेदी- विक्रीत अपहार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह १६ जणांना नोटीस बजावल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन उपक्रमाचे लेखापरीक्षण सुरू आहे. २०१६-१७ या कालावधीत डिझेल खरेदी-विक्रीच्या नोंदीमध्ये ११ हजार लीटर डिझेल पुरवठ्याची नोंद आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ११ हजार लीटरच्या नोंदीमध्ये एक या आकड्याला व्हायटनर लावले आहे. ही नोंद संशयास्पद असल्याचे अतिरिक्त लेखापरीक्षकांचे मत आहे. यानुसार परिवहन विभागातील १६ कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. परिवहनचे नियंत्रण अधिकारी म्हणून तत्कालीन अतििरीक्त आयूक्त श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती होती.

त्यामुळे मायकलवार यांच्याकडूनही खुलासा मागवण्यात आला आहे. समााधानकारक खुुलासा न आल्ययास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असा इशाराही आयुक्तांनी दिला. परिवहन उपक्रमाला केंद्र शासनाकडून १०० बस मिळाल्या होत्या. या बसची चेसी क्रॅक असल्याचा निष्कर्ष निघाल्याने या बस धूळखात आहेत. या प्रकरणात मनपा आणि अशोक लेलँड कंपनी यांच्यात न्यायालयीन वाद झाला.

निकाल मनपाच्या विरोधात गेला. या प्रकरणात मनपाने पुण्याच्या सल्लागार कंपनीकडून अहवाल मागवून घेतला. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर होणार आहे. यातही परिवहन अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, नोंदी ठेवल्या नाहीत, अपुरी माहिती पुरविली असे एकूण २५ आक्षेप दिले आहेत. यानुसारही अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या