21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसोलापूरलाच स्वीकारताना एनटीपीसीचा अधीकारी सीबीआयच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना एनटीपीसीचा अधीकारी सीबीआयच्या जाळ्यात

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मजूर पुरवठा करणा-या ठेकेदाराकडून एक लाखाची लाच स्वीकारताना एनटीपीसीअंतर्गत मुख्य मजूर ठेकेदार कंपनीचा अधिकारी गोविंदकुमार हा शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या जाळ्यात अडकला. शनिवारी दुपारी एनटीपीसीच्या परिसरात ही कारवाई झाली.

कंपनीने यूपीएल (युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड) या कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचे मुख्य कंत्राट दिले आहे. ही कंपनी स्थानिक ठेकेदाराना लिलाव पद्धतीने मजूर पुरवठ्याचे कंत्राट देते. एनटीपीसी मध्ये २० मजूर पुरवठादार काम करतात. दरवर्षी अशा पद्धतीने ५० कोटींचे कंत्राट या कंपन्यांना दिले जाते. यूपीएल कंपनीचे अधिकारी लाच घेत असल्याची तक्रार होटगी स्टेशन येथील मजूर पुरवठादाराने सीबीआयकडे केली होती. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा ठेकेदार यूपीएलचे अधिकारी गोविंदकुमार यांना एक लाख रुपये देताना सीबीआयच्या अधिका-यांनी सापळा रचून पकडले. यावेळी त्यांचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरला.

सीबीआय अधिका-यांनी गोविंदकुमारला ताब्यात घेऊन त्याच्या एनटीपीसी परिसरातील राहत्या घराची झडती घेतली. त्यानंतर त्याला चौकशीसाठी नेण्यात आले. यूपीएल कंपनीकडे या ठेकेदाराची पाच लाख रुपये सुरक्षा ठेव जमा होती. ती परत मागताना गोविंद कुमारने अडीच लाख रुपये लाच मागितल्याची तक्रार आहे. त्यांपैकी शनिवारी एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. ही माहिती ठेकेदाराने सीबीआयच्या पुण्यातील अधिका-यांना दिली त्यानंतर ही कारवाई झाली. अलीकडच्या काळात स्पर्धा वाढल्याने ठेकेदार पुरवणा-या कंपन्यांची संख्या वाढली आहे. या संधीचा फायदा उठवत गोविंद कुमार उपठेकेदारांकडून मोठी रक्कम स्वीकारत असे. जास्तीत जास्त रक्कम देणा-या ठेकेदाराला ठेका दिला जात होता.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या