30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeसोलापूरभारतात डब्ल्यूआयटीला प्रथम क्रमांक

भारतात डब्ल्यूआयटीला प्रथम क्रमांक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा (अकउळए) महिला सबलीकरण विषयक प्रथम क्रमांकाचा,लिलावती २०२० हा पुरस्कार वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पटकाविला एक लाख रुपयेचा धनादेश आणि मानपत्र असे या पूरस्काराचे स्वरूप आहे. ‘शिक्षण हाच धर्म’ हे ब्रीद स्वीकारून शतकोत्तर वाटचाल करण्या-या वालचंद शिक्षण समूहाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरून देशात आपले अव्वलस्थान तर राखले आहेच, त्याचबरोबर पर्यावरणाची जाण ठेवून परीसर नीर्मीती केल्या बद्दलचा देशातील मानाचा, एनवायरमेंट कॅम्पस पुरस्कार पटकावून सामाजिक उपक्रमातही आघाडीवर असल्याचे सिद्ध केले आहे. तसेच डब्लू.आय. टी.च्या महीला सबलीकरण कार्याची दखलही देशपातळीवर घेतल्याने ख-या अर्थाने महिला सक्षमीकरण धोरणाला बळ मिळवून दिले आहे.

डॉ. रुपाली शेळके, डॉ. प्रतिभा याळगी झ्र कालदीप, डॉ. रोहिणी मेरगु, प्रा. रश्मी दीक्षित, आणि प्रा. दिपाली अवसेकर अशी पुरस्कार प्राप्त महिला प्राध्यापकांची नावे आहेत. अखिल भारतीय स्तरावर ह्लमहिला सबलीकरणह्व या विषयांतर्गत केल्या गेलेल्या मूल्यमापन स्पर्धेत ४५६ स्पर्धक सहभागी होते. त्यातून प्रथम फेरीत ३१ तज्ञांकडून मुल्यांकन करून दुस-या फेरीसाठी ६४ स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत ९ तज्ञांकडून परीक्षण करून त्यातील २५ जणांना विजेते घोषित करण्यात आले त्या मध्ये डब्ल्यू. आय. टी.ने बाजी मारली. डब्ल्यू.आय.टी. पाठोपाठ पुना कॉलेज ऑफ फार्मसी आणि तामिळनाडू राज्यातील कुमारगुरु कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी हे विजेते ठरले आहेत.

प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्लमहिला आरोग्य ह्ल या उपविषयांतर्गत विविध जनजागृती उपक्रम आणि तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर, योगासन वर्ग, विषयनिहाय विविध कार्यशाळा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. या सर्व उपक्रमांतर्गत डब्ल्यू.आय.टी. च्या महिला प्राध्यापक वर्गाने अनेक महत्वाचे विषय हाती घेऊन त्यावर विशेषत्वाने काम केले. सामाजिक योगदानाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयात आयुर्वेदिक गर्भसंस्कार शिबीर, महिला सुरक्षित जाणीवासाठी पथनाट्य, रक्तदान शिबिर, गरीब,अपंग, वृद्धांना अन्नदान, स्टे फीट स्टे यंग या युटूब चॅनलवरून आरोग्यविषयक जनजागृती आदी अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात. कोव्हिड-१९ च्या काळातही अतिशय तत्परतेने कर्तव्याला अग्रस्थानी ठेवून या महिला प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेऊन प्रत्येकीने एक लाखामधील प्रत्येक शून्याचे स्थानच जणू प्राप्त केले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वालचंद शिक्षण समूहाचे समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी यशस्वी महिला प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

हिंगोलीत उभारणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या