23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरचाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, बार्शीत भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा

चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, बार्शीत भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा

एकमत ऑनलाईन

बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी बार्शीतील भाजप कार्यकर्ते युवराज चंद्रकांत ढगे (रा. प्रसन्नदाता मार्ग, बार्शी) यांच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ढगे यांना अटक झाली. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकली होती. ‘मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर आईच्या गावात अन १२ च्या भावात या समाजमाध्यमावरील अकाऊंटवर चाकणकर यांची ही पोस्ट टाकण्यात आली.

चाकणकर यांच्या पोस्टबद्दल आपले मत काय? असे विचारण्यात आले. त्यावर युवराज ढगेने आक्षेपार्ह उत्तर दिले. ही पोस्ट व उत्तराचा स्क्रीन शॉट राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे बार्शी शहराध्यक्ष इब्राहिम शेख यांनी फिर्यादी शिक्पुरे यांना दाखविला. त्यानंतर शिवपुरे यांनी युवराज ढगेविरोधात विरोधात तक्रार दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या