पंढरपूर (प्रतिनिधी ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद असले तरीही मंदिरात नित्य उपचार सुरू आहेत. आज (अधिक महिना) पुरुषोत्तम मास कमला एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सभामंडप, सोळखांबी व इतर भागांची सजावट आकर्षकरित्या करण्यात आली आहे.
सभामंडपामध्ये ही आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. रंगबेरंगी फुलांची सुंदर मनमोहक अशी सजावट प्रत्येकाला आकर्षित व मनमोहून टाकणारी असल्याचे दिसत आहे. हि सजावट पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन दर्शन व व्हिडीओच्या माध्यमातून भाविक आपल्या सावळ्या विठुरायाचे दर्शन घेत आहेत.
8 वीत शिकणाऱ्या मुलीनं मोठा निर्णय घेऊन आयुष्य संपवल्यामुळे खळबळ