टेंभूर्णी : येथील लॉजवर व्याजाने दहा हजार रुपये देतो म्हणून दोन महिन्यांपूर्वी ४२ वर्षीय महिलेवर दुष्कर्म करण्यात आले होते. पुन्हा शारीरिक सुखाची मागणी महिलेने मान्य न केल्याने महिलेचा अश्लिल व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी रमजान रज्जाक तांबोळी (वय २८ रा. करकंब ता. पंढरपूर) याच्या विरोधात टेंभुर्णीत गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
२७ एप्रिल रोजी ४२ वर्षीय महिलेची सोशल मीडियाचा माध्यमातून रमजान रज्जाक तांबोळी याच्याशी ओळख झाली होती. तिला दहा हजार रुपये व्याजाने देतो म्हणून जबरदस्तीने टेंभुर्णी येथील लॉजवरती बोलावून शारीरिक संबंध निर्माण केले होते. दोन महिन्यानंतर पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी महिलेकडे केली. त्यास महिलेने नकार दिला. त्यामुळे सोशल मीडियावर संशयिताने व्हीडीओ व्हायरल केला.