31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeसोलापूरऑनलाइन मटका प्रकरण; नगरसेवक सुनील कामाटी यास 3 दिवसांची पोलीस कोठडी

ऑनलाइन मटका प्रकरण; नगरसेवक सुनील कामाटी यास 3 दिवसांची पोलीस कोठडी

एकमत ऑनलाईन

सोलापूर:-राजभुलक्ष्मी इमारत कोंचिकूर्वी गल्ली सोलापूर या ठिकाणी पोलिसांनी दि 24/8/2020 रोजी मटका बुकी वर छापा टाकला होता. सदर प्रकरणी नगरसेवक सुनील कामाटी यास हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती.
आरोपी सुनील कामाटी यास प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्री एम एम बवरे साहेब यांच्या समोर उभे केले असता आरोपीस सात दिवसाची पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती.

त्यावर आरोपींचे वकील यांनी सदर गुन्हा 24/ 8/ 2020 रोजी घडला असून आरोपींकडून काही जप्त करण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असे मुद्दे मांडले.त्यावर न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी नगरसेवक सुनील कामाटी व इस्माईल मुच्छाले याना दिली.

याप्रकरणी आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे एडवोकेट विनोद सूर्यवंशी एडवोकेट श्रीकांत पवार यांनी तर सरकार पक्षातर्फे एडवोकेट करवते मॅडम यांनी काम पाहिले.

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या