20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home सोलापूर कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडा

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडा

अन्यथा आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार; वारकरी संप्रदाय मंडळाची भूमिका

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : शासनाने कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करू परंतु आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी यात्रेत मंदिर परिसरात संचारबंदी करू नये अशी मागणी शासन दरबारी महाराज मंडळींनी केली आहे. कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पंढरपूर येथील वासकर महाराज मठात पत्रकार पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी रामकृष्ण वीर महाराज, राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उपळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.

आषाढी यात्रेत वारकरी संप्रदायाने सहकार्य केले होते. आता शासनाने कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना सहकार्य करावे.प्रत्येक मठात ५० लोक राहण्याची परवानगी द्यावी. शासनाने कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. परंपरा राखण्यासाठी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजे पर्यंत नगर प्रदक्षिणा घालण्यास परवानगी द्यावी. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना सहकार्य नाही केली तर पुढील सर्व निवडणुकीत मतदान करणार नाही.

कार्तिकी यात्रेत किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा.
शासनाने कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. जर मंदिर भाविकांसाठी खुले करणे शक्य नसेल तर किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा वे अशी मागणी महाराज मंडळींनी केली आहे.

फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता : मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या