सोलापूर : मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दिरासोबतच्या अनैतिक संबंधाच्या आड येणा-या आईचा मुलीनेच काटा काढल्याची घटना सोलापुरात घडली आहे. लक्ष्मीबाई माने (४०) असे मयत महिलेचे नाव असून मुलगी अनिता जाधव आणि तिच्या दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस चौकशीत मुलगी अनिताने आपल्या आईचा खून केल्याची कबुली दिली आहे.
सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील कुमठे येथील महालक्ष्मी नगर येथे राहणाºया लक्ष्मीबाई माने (४०) यांचा मृतदेह ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरात आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मृतदेहाच्या गळ्यावरील निशाणावरुन गळा दाबून खून केल्याचा प्रथमदर्शी संशय पोलिसांना आला. यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
मृतक लक्ष्मीबाई माने ह्या गेल्या काही वर्षांपासून सावत्र भावासोबत राहत होत्या. त्याच्या भावाला दारूचे व्यसन असल्याने कदाचित वादातून त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, मृत महिलेची मुलगी आईला भेटण्यासाठी आली होती, अशी माहिती त्याने दिली. त्यावरुन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि या हत्याकांडाचा छडा लागला.
सर्वांत मोठा गुंड कौन, यावरून खून