23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeसोलापूर...अन्यथा पालकमंत्र्यांच्या गाडीला कांद्याने आंघोळ घालू

…अन्यथा पालकमंत्र्यांच्या गाडीला कांद्याने आंघोळ घालू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्हा बरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनिय झालेली आहे कवडीमोल किमतीने कांदा व्यापारी विकत घेतात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गेलेला खर्च सुद्धा निघत नाही त्या शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झाल आहे आणि एकीकडे राज्यकर्ते सत्ता आमच्या हातात द्या आम्ही हमीभाव देऊ परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व पालकमंत्री शेतीमालाला हमीभाव द्यायला जमत नसेल तर शेतकऱ्यांना विषारी औषधाची बाटली तर द्या असे भावनिक आवाहन संतापलेले जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सरकारला केले आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यापासून शेतकरी कांदा कवडीमोल किमतीने विकत आहे अक्षरशः एकरी झालेल्या खर्चाचा तर हिशोबच नाही त्या शेतकऱ्याचे टेम्पोचे भाडं सुद्धा निघत नाही ही शोकांतिका आहे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ईमेलद्वारे मागणी केलेली आहे.

पत्रकारांशी पुढे बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपये दर द्यावा तसेच प्रतिक्विंटल शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याचे दीड हजार रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा चार मार्च रोजी वार शनिवारी होणाऱ्या पालकमंत्र्याच्या दौऱ्यात पालकमंत्र्यांना अथवा पालकमंत्र्याच्या गाडीला कांद्याने आंघोळ घालुन जाब विचारु आथवा रस्त्यावर कांदा टाकून पालकमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचेही देशमुख यांनी बोलताना सांगितले .यावेळी नाना मोरे श्रीकांत नलवडे पिनू देशमुख सुरेश नवले अपंगसेलचे उत्तम सरडे किशोर दत्तू ज्ञानेश्वर भोसले महेश बिस्किटे दामाजी मोरे पप्पू दत्तू मारुती भुसनर संकेत शिरसागर विवेक भोसले ऋषिकेश शिनगारे आदी ऊपस्थीत होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या