24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeसोलापूरपंढरपुरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला

पंढरपुरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : दिवसोंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पंढरपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याचे भयाण वास्तव व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावरून पंढरपूर येथील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी याबाबतचे वृत्त प्रसारित करून कोरोना बाबतची भीती दैनिक एकमताने व्यक्त केली होती.

काही दिवसांपासून पंढरपूरचा कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार करत होता. मात्र पोट निवडणूकी दरम्यान झालेल्या गर्दीमुळे ही संख्या दोनशेच्या पुढे दररोज चालली आहे. याबाबतचे वृत्त दैनिक एकमतने प्रसारित करून ही भीती व्यक्त केली होती. याबाबत प्रशासनास व नागरिकांना सतर्क केले होते.रविवारी पंढरपूर शहरात ६९ तर ग्रामीण भागात १२२ असे १९१ रुग्ण आढळून आले आहेत.४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पंढरपूर येथील १२९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केली जात आहे. मात्र दिवसेंदिवस संख्या वाढू लागली आहे. याबाबतचे भयान वास्तव पंढरपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून पंढरपुरातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरिकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर : ना. चव्हाण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या