19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरपंढरपूर : घरफोडी करणारी टोळी जेरबंद

पंढरपूर : घरफोडी करणारी टोळी जेरबंद

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर शहर परिसरात घरफोडी करणा-या चोरांच्या टोळीला जेरबंद करून घरफोडीचे ६ गुन्हे पंढरपूर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्याचबरोबर जबरी चोरी करणा-या आरोपीला अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे. या कारवाई दरम्यान १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर कृष्णात हराळे (वय २९ रा. झाखल. ता. पन्हाळा जि. कोल्हापूर सध्या रा. नामानंद महाराज मठ पंढरपूर), लखन कालिदास काळे (वय २१ रा. अर्बन बँकेजवळ पंढरपूर) व इतर दोन साथीदारांसह शहरात चोरी केली.

यानंतर सागर कृष्णात हराळे व लखन कालिदास काळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी पाच घरफोड्या केल्याचे कबुली दिली. पाच घरफोड्यांच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी २० हजार ९०० रुपये ंिकमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शहरातील लोणार गल्ली शिवाजी चौक येथील एका नागरिकांच्या घरातील कपाटातील ९० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळवले होते. या गुन्ह्याचा तपास करून सौरभ उर्फ अक्षयकुमार नवत्रे (वय २५ रा. लोणार गल्ली पंढरपूर) यास ताब्यात घेतले आहे.

तसेच तिरंगा नगर येथील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण पळविले होते. या प्रकरणी शंकर उर्फ पप्पू सूळ (वय २५) दुर्योधन उर्फ बबलू कांतीलाल चोरमले (वय २० रा. गोंदी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी २६ हजार किमतीचे गंठण हस्तगत केले आहे.

Read More  परभणी : शेतक-यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्याची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या