24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeमहाराष्ट्रकैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज येथे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुयायी आणि एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरानंतर सर्वात श्रद्धेय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ ओळखला जातो. वारकरी संप्रदायात कैकाडी बाबांचे स्थान मोठे होते आणि तोच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना अकलूज येथे दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

रामदास महाराजांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या हजारो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. संत कैकाडी बाबा, ह. भ. प. कोंडीराम काकांचे अध्यात्मिक कार्य रामदास जाधव महाराज यांनी अतिशय नेटाने पुढे चालवले होते. संत गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार, बहुजन समाजातील युवकांना जागृत करण्याचे मोठे काम रामदास महाराज यांनी केले. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथापरंपरा यावर रामदास महाराज कठोर शब्दात प्रहार करीत असत. त्यामुळे बहुजन समाजातील युवक वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या