25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरपंढरपूरच्या आमदारकीचा उद्या फैसला

पंढरपूरच्या आमदारकीचा उद्या फैसला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पंढरपुर पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आज मतदार राजा आपले मत उमेदवारांच्या पारडयात टाकून पंढरपूर विधानसभेचा पुढील आमदार ठरविणार आहेत. आ. भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची ही पोटनिवडणुक लागली असून जवळपास १९ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपने निवडणुक प्रतिष्ठेची केल्यामुळे राज्यातील मात्तबर नेत्यांनी पंढरपूरात येउन सभा घेतल्या आणि आपआपल्या पक्षांच्या उमेदवारांना निवडुण देण्याचे साकडे मतदारांना घातले. आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी मतदान होत असून मतदार राजा कोणाच्या पारडयात विजयी दान टाकेल हे २ मे रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

प्रचारातील मातब्बरांच्या सहभागामुळे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. थकीत एफआरपीप्रकरणी चालू हंगामात कारवाई झालेल्या संत दामाजी व श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष या निवडणुकीत आमने-सामने आहेत. या दोघांपैकी कोणता साखर सम्राट आमदार होणार? की तिसराच बाजी मारणार? याचा फैसला पंढरपूर- मंगळवेढ्यातील मतदार आज (17 एप्रिल) करणार आहेत. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र व श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके तर त्यांच्या विरोधात भाजपतर्फे संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे निवडणूक ंिरगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी प्रचारात राळ उडवून दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार सचिन शिंदे यांच्यासाठी कंबर कसली आहे. अपक्ष शैला गोडसे यांनी ह्लएकला चलोरे म्हणत प्रचारात रंगत आणली. सिद्धेश्वर आवताडे देखील अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावून बघत आहेत. भगीरथ भालके यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी समाधान आवताडे यांच्यासाठी जोर लावला आहे. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार असले तरी भगीरथ भालके व समाधान आवताडे यांच्यातच प्रमुख लढत असल्याचे मानले जात आहे. भगीरथ भालके हे श्री विठ्ठल सहकारी तर समाधान आवताडे हे संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही कारखान्यांवर यंदाच्या गळीत हंगामात थकीत एफआरपी संदर्भात साखर आयुक्तालयाकडून आरआरसीनुसार (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या दोन्ही कारखान्यांकडे असलेल्या एफआरपीच्या थकबाकीचा मुद्दा प्रचारात उपस्थित केला होता. शैला गोडसे यांनीही दोन्ही कारखान्यांच्या स्थितीबद्दल संबंधित उमेदवारांनाच जाब विचारण्याचे आवाहन केले होते. थकीत एफआरपीचा मुद्दा व मंगळवेढयातील ३५ गावांचा पाणी प्रश्न निवडणुकीत कितपत प्रभावी ठरतो, ते 2 मे रोजीच स्पष्ट होणार आहे. सचिन शिंदे, शैला गोडसे व सिद्धेश्वर आवताडे किती व कोणाची मते घेतात, यावरच भालके व आवताडे यांचे यश-अपयशाचे गणित अवलंबून राहणार, हे उघड आहे. या निवडणुकीत आ. प्रशांत परिचारक, आ. संजय शिंदे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते राजु शेट्टी, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आदी दिग्गज नेत्यांनी आपआपल्या उमेदवारांसाठी मतदारांना साकडे घातले.

उमरी, माहूर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी न.पं.कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या