22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरपंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वाचवला जातोय ४० टक्के ऑक्सिजन; नॉन-रीब्रीथर मास्कचा वापर

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वाचवला जातोय ४० टक्के ऑक्सिजन; नॉन-रीब्रीथर मास्कचा वापर

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : सध्या कोरोना विषाणूने राज्यासह सोलापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. यामुळे रोज प्रत्येक शहरात शकडो व हजारो कोरोनाचे रुग्ण बाधित होत आहेत. यामुळे संंबंध महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. अनेकांना ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करुन ४० टक्के ऑक्सीजन वाचवण्याचे काम येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरंिवद गिराम व त्यांच्या टिमकडून होत आहे.

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ११५ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ४६ ऑक्सिजन चालू आहे. डॉ. अरंिवद गिराम यांचे २००९-१० मध्ये एका ठिकणी प्रशिक्षणासाठी गेले होते. या दरम्यान त्यांना ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या रुग्णांना योग्य प्रकारे, व आश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा कशा पध्दतीने केला जाईले यांचे मार्गदर्शन मिळाले होते. त्या दरम्यानच त्यांना नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते.

सध्या ऑक्सीजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांना वेळत उपचार मिळत नाहीत. यामुळे त्यांनी ऑक्सीजनचा योग्य वापर व्हावा. यादृष्टीने उपजिल्हा रुग्णालयातील ३९ जणांना नॉन रीब्रीथर मास्क लावून ऑक्सीजन देण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. यामुळे ऑक्सीजन लावलेल्या रुग्ण श्वास घेता तेव्हा तो पिशवीमधून ऑक्सिजनमध्ये श्वास घेत आहात. मास्कच्या बाजूला असलेल्या वायुमधून श्वास बाहेर टाकलेली हवा बाहेर पडते आणि परत वातावरणात जाते.

यामुळे ऑक्सीजन वाया जात नही. तसेच फक्त त्या माणसाच्या शरीरात ऑक्सीजनच जातो. या पध्दतीमुळे रोजच्या पेक्षा आता ४० टक्के ऑक्सीजन वाचला जात आहे. हे सर्व काम डॉ. अरंिवद गिराम, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. सचिन वाळुजकर, डॉ. शिव कमल, परिचारिका जयश्री बोबले, रेखा ओंबासे, नाडगौडा करत आहेत.

आता फक्त ५० ऑक्सीजन सिलेंडर लागतात
उपजिल्हा रुग्णालयात ५० च्या आसपास कोरोना रुग्णांना रोज कृत्रिम ऑक्सीजनचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी किमान रोज ९० ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता असते. परंतु नॉन रीब्रीथर मास्कचा वापर सुरु केल्यापासून तेवढ्याच रुग्णांना सध्या ५० ऑक्सीजन सिलेंडर लागत असल्याचे डॉ. अरंिवद गिराम यांनी सांगितले.

कोरोना संकटाच्या नावाखाली शासनाने शेतक-यांना सोडले वा-यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या