21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeसोलापूरवाढत्या वीज बिला विरोधात पंढरपूरकर आक्रमक

वाढत्या वीज बिला विरोधात पंढरपूरकर आक्रमक

वीज मंडळाच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी केले आंदोलन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून देशभरासह राज्यात लॉक डाऊन करण्यात आला. यादरम्यान वीज वितरण कंपनीकडून वाढीव वीज बिले आकारण्यात आली आल्याचा आरोप करीत पंढरपूर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी मागण्यांचे निवेदन पंढरपूर येथील कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ यांना देण्यात आले. यावेळी विविध संघटनांच्या अधिकाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणावर पंढरपूरकर उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून देशभरासह राज्यात लॉक डाऊन करण्यात आला. या दरम्यान वीज मंडळाकडून  मोठ्या प्रमाणावर घरगुती व व्यावसायिक वीज बिले वाढीव आकारण्यात आली असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आली आहेत.

लॉक डाऊन दरम्यान सर्व उद्योगधंदे व व्यवसाय ठप्प झाल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना या वाढीव वीज बिलामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाढीव वीज बिला विरोधात पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी घरगुती विज बिले मार्च १९ ते सप्टेंबर १९ मध्ये जेवढे होते. त्या प्रमाणे विज बिले आकारण्यात यावीत व त्यामध्ये ५० टक्के वीजबिल सूट देण्यात यावी, व्यावसायिक वीज धारकांकडून युनिटप्रमाणे वीज बिल भरून घ्यावे, स्थिर आकार रद्द करण्यात यावा, वहन आकार रद्द करावा, वीज शुल्क रद्द करावा, विज बिलावरील व्याज व व्याजाची थकीत रक्कम माफ करावी, समायोजित रक्कम रद्द करावी आदी मागण्यांसाठी पंढरपूर येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या