29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूरपंढरपूर-मंगळवेढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

पंढरपूर-मंगळवेढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कोरोनाची दुसरी लाट दिवसोंदिवस राज्यात वेगाने पसरू लागली आहे. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून यामध्ये मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात ९२५ रुग्ण आढळून आले असून ५७५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

यामध्ये सोमवारी पंढरपूर येथे १११ तर मंगळवारी १३१ रुग्ण आढळून आले आहेत.तर मंगळवेढ्यात सोमवारी ७९ तर मंगळवारी ५९ रुग्ण आढळून आले होते. सध्या पंढरपूर येथील ९८३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे तर मंगळवेढ्यातील ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून इतर तालुक्यांपेक्षा पंढरपूर आणि मंगळवेढा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोटनिवडणुकीसाठी राज्यभरातील अनेक पक्षांच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पंढरपूर आणि मंगळवेढ्यात येत असल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याची चर्चा जाणकार वर्गातून सुरू आहे. यामुळे पुढील काळात पंढरपूर आणि मंगळवेढयात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून पुढे येऊ लागली आहे. सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. यासाठी राज्यभरातील अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी दाखल होत आहेत. यामध्ये कोरोना बाधित भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार संघात दाखल होत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत प्रचार सभा घेतल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याने सोशल डिस्टंंिसग तसेच कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

यामुळे पुढील काळात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे चर्चा जाणकार वर्गातून सुरू आहे. याबाबत पोट निवडणुकीदरम्यान मतदारसंघात येणा-या पदाधिका-यांची व कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी करूनच मतदार संघात प्रवेश दिला जावा. अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने ही बाब हाताळणे गरजेची आहे. अन्यथा पुढील काळात मोठ्या प्रमाणावर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा जाणकार वर्गातून केली जात आहे.

नांदेड गतवर्षी ग्रिनझोन ; आज ‘टॉप टेन’ मध्ये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या