22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसोलापूरपॅराडाईजचे मधील ग्राहक जेलमध्ये तर बारबालासह मॅनेजर वेटर चालक जामीनावर मुक्त

पॅराडाईजचे मधील ग्राहक जेलमध्ये तर बारबालासह मॅनेजर वेटर चालक जामीनावर मुक्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पॅराडाईज डान्स बारमधील ८ बारबाला, चालक, मॅनेंजर, वेटर यांना जामीनावर मुक्त करण्याचा तर पकडण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यादंडाधिकारी एम आर देवकते यांनी दिला. पॅराडाईज डान्सबारचे चालक संजय अजित पोळ (वय 41, रा. प्लॉट नं. 87,आर्य चाण्नय नगर, सैफुल सोलापूर), मॅनेजर मुकेशंिसग सुरेशंिसग बायस (वय 47, रा. राधे अपार्टमेंट वसंत विहार फेज 3, सोलापूर),वेटर विजय शिवशंकर तिवारी (वय 47, रा.घर नं.9/227, शहा बझार, कलबुर्गी, कर्नाटक), ऑपरेटर विशाल राजेंद्र कोळी (वय 26, रा.कृष्णा नगरी, सैफुल विजापूर रोड सोलापूर) यांच्यासह 8 नृत्यांगणा यांना जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला तर सर्व ग्राहकांचा जामीन अर्ज नामंजुर करून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पॅराडाईज डान्सबारवर शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी छापा टाकून 8 बारबालासह 38 जणांना अटक करून जवळपास 48 लाख 98 हजार 330 रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले होते. ही कारवाई गुरूवार दि. 10 जून रोजी रात्रीच्या सुमारास झाली होती. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली त्यानंतर या सर्व आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

यामध्ये पोलीसांकडून न्यायालयात ज्यांना पोलीस कोठडी मागण्यात आली त्यांना जामीनावर मुक्त करण्याचा आदेश देण्यात आला तर ज्यांना न्यायालयीन कोठडी पोलीसांनी मागितली त्यांना जामीनावर मुक्त करण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी देवकते यांनी दिला. या प्रकरणी आरोपींच्या वतीने अ‍ॅड गुरूदत्त बोरगांवकर, अ‍ॅड विश्वास शिंदे, अ‍ॅड देवदत्त बोरगांवकर, नृत्यांगणाकडून अ‍ॅड विनोद सुर्यवंशी, अ‍ॅड हेमंतकुमार साका यांनी तसेच सरकारच्या वतीने अ‍ॅड विद्या जाधव यांनी बाजू मांडली.

निवघा बाजार येथील बाजारपेठेतील मुख्य रस्ता जलमय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या