सोलापूर : तालुक्यातील कुरघोट येथे तितर पक्ष्याची शिकार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या साहिल सनधी यांनी वनविभागाला शिकारीविषयी माहिती दिली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार १५ जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट या गावात नागनाथ अण्णपा खटेकर (वय ५५) याला अटक करण्यात आली. साहिल सनधी यांनी आरोपीस पकडून वनविभागाला या प्रकाराची माहिती दिली. वन परिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाणे, वनपाल एस. ई. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वनरक्षक टी. एम. बदाणे घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.