34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeसोलापूरबार्शी कोविड सेंटरमध्ये रूग्णाची आत्महत्या

बार्शी कोविड सेंटरमध्ये रूग्णाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक कॉलेज येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका व्यक्तिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.उमेश भागवत कोंढारे वय-३७ वर्षे असे त्या व्यक्तीचे नाव असून चिखर्डे या गावची शेतकरी आहे.कोंढारे यांना ३१ तारखेला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून पुढे आले.त्यानंतर त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यानंतर जास्त त्रास होत असल्याने ३ एप्रिल रोजी त्यांना आणि त्याच्या आई,पत्नी आणि दोन मुलांना बार्शी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले की ६ एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देणार होते.परंतू गेल्या काही दिवसांपासून तो व्यक्ती नैराश्येत होता.तो आपल्या बायको मुलांना म्हणायचा मी काय आता नीट होत नाही,माझ्या नंतर माझ्या मुलांची काळजी घे.आईला नीट संभाळ.आई आणि पत्नीने देखील त्यांची खूप समजूत काढली.डॉक्टर आणि तेथील स्टाफनेही समजून सांगितले की कोरोना हा बरा होणारा आजार आहे.तुम्ही नीट होऊन घरी जाल.परंतू दि.६ एप्रिलला पहाटे साडे चारच्या सुमारास कोव्हिड सेंटरच्या दुस-या मजल्यावर जाऊन एका कोरोना पेशंटने वाळायला टाकलेल्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

यावरून एक लक्षात येते की कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे.लोकांनी आता शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे.लोकांच्या हालगर्जीपनामुळेच अशा निष्पाप लोकांचा बळी जात आहे.कोरोना वाढत आहे.यावेळी झालेल्या घटनेच्या ठिकाणी प्रांताधिकारी हेमंत निकम,डीवायएसपी धाराशिवकर,मुख्याधिकारी दगडे-पाटील,तहसीलदार शेरखाने,पोलिस निरीक्षक गिरीगोसावी,तालुका आरोग्यधिकारी ढगे,नायब तहसीलदार मुंढे,पोउनि शिंदे,कॉन्स्टेबल खराडे यांनी भेटी दिल्या व योग्य ती विचारपूस करण्यात आली.

ही आत्महत्या नैराषयेच्यापोटी केलेली आहे.वैद्यकीय सेवा देण्यात शासन कमी पडत नाहिये.येथे सर्व सोयीसुविधा आहेत जेवण,नाष्टा,चहा,पाणी.आत्महत्या करणारी व्यक्तीला गेल्या चार दिवसांपासून सर्वांनी समजून सांगितले होते.डॉक्टरांनी भेट घेऊन उपचारासोबत आधार देयचे काम केले होते.इतके सांगून देखील आत्महत्या केली.इथून हजारो रुग्ण बरे होऊन गेले आहेत.त्यामुळे कोणीही खचून न जाता असे टोकाचे पाऊल उचलू नये.
प्रांताधिकारी -हेमंत निकम

लोकांनी खचून जाऊ नये.बार्शी हे मोठे मेडिकल हब आहे.सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत.कोरोना हा जीवघेणा आजार नाही यातून हजारो लोक बरे होऊन घरी गेले आहे.लक्षणे जाणवल्यास लवकर तपासणी करा आणि उपचार घ्या.टोकाचे पाऊल उचलताना कुटुंबाचा विचार करा.कोरोना हा कायमस्वरूपी आजार नाही.सर्वांनी लसीकरण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचे काम करा.
संतोष गिरिगोसावी-पोलिस निरीक्षक

नागरिकानी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.तरीही संसर्ग झाला तर योग्यवेळी तपासणी करून घ्यावी.आहार सकस ठेवावा,थोडासा व्यायाम,प्राणायम आणि योगा करावा.तरीही कोरोना झाल्यास सकारात्मक दृष्टिकोण ठेवून त्यातून बाहेर पडावे आत्महत्या हा पर्याय नाही.
डॉ.शीतल बोपलकर-आरोग्यधिकारी ग्रामीण रुग्णालय

लोकांमध्ये अन्टीबॉडी तयार झाल्या आहेत.मृत्युदर देखील कमी आहे.लोकांनी घाबरून जाऊन आत्महत्येचा निर्णय घेऊ नये.आलेल्या संकटाला धैर्याने तोंड द्यावे.कोरोनातून शंभर टक्के बरे होऊन घरी जाऊ हा आत्मविश्वास ठेवावा.
सपोनि शिवाजी जायपत्रे-तालुका पोलिस स्टेशन

झालेली घटना दुर्दैवी आहे.वयस्कर लोकांनी काळजी घ्यावी.तरुणांनी घाबरून जाऊ नये.तरुणांना यात कमी धोका आहे.तरीही सर्वांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळावे.असे प्रसंग घडू नयेत याची काळजी घ्यावी.
पोउनि गणेश शिंदे-बार्शी शहर पोलिस स्टेशन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या