31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरपंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

अन्यथा आ.गोपीचंद पडळकर यांचा पवार आणि ठाकरे यांच्या मातोश्री व सिल्वर ओक समोर आंदोलन करण्याचा इशारा

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : एसटी प्रवर्गाच्या दाखल्यासाठी पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात धनगर समाजाचे कार्यकर्ते पारंपारिक वेशात पिवळे ध्वज, गजी ढोल घेऊन एकवटलाचे चित्र पहावयास मिळाली.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पडळकर म्हणाले की ढोल बजाव आंदोलन करुनही सरकाला जाग आली नाही तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री समोर आणि देशाचे नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज दिला आहे.

सरकारने धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी मागणी करत सत्ताधारी आघाडी सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ही आमदार पडळकर यांनी केली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज यांच्यासह धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या