26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरबीपी,शुगर,दमा,हार्टचे गंभीर आजार असणा-या वयोवृद्धांच्या जीवाशी खेळ

बीपी,शुगर,दमा,हार्टचे गंभीर आजार असणा-या वयोवृद्धांच्या जीवाशी खेळ

एकमत ऑनलाईन

बार्शी : येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये प्रशासनाचा पुन्हा एकदा सावळा गोंधळ पहायला मिळाला.लस येणार म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून लसिकरण केंद्रावर लोक येऊन नंबर लाऊन थांबले होते.तरीही त्यांना दुपारचे दोन वाजले तरी लस मिळत नाही.यामध्ये अनेक वयोवृद्ध व्यक्ती असून त्यातील ब-याच जणांना बीपी,शुगर,दमा,हार्टचे आजार आहेत.अशा लोकांच्या जीवाशी खेळून बार्शीतील आरोग्य प्रशासन वशीलेबाजी आणि नेत्यांच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना नंबर न लावता लसी देत आहेत अशी चर्चा लसीकरण केंद्रावर पहायला मिळाली.

दुसरीकडे एका कॉम्प्यूटरवर अनेकजन नोंदणी करत आहेत.तेच नोंदणी करण्यासाठी कॉम्प्यूटरची संख्या वाढवून लसीकरणासाठी लांब होणा-या रांगा नियंत्रणात आणता येतील.मात्र असे न होता एकच रांग केली जातेय यामुळे लसीकरण केंद्र कोरोना हॉटस्पॉट होण्याची देखील भीती वर्तवली जात आहे.त्यामुळे सर्वसामान्यांची लसीकरण केंद्रावर गळचेपी होत आहे आणि दुसरीकडे धनदांडग्या,वशीले असणा-या लोकांना लस दिली जात आहे त्यामुळे बार्शीतील सर्वसामान्य लोकांमध्ये आरोग्य प्रशासनाच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे येणा-या काळात जर हे असेच चालले तर प्रशासन विरुद्ध सर्वसामान्य जनता असा संघर्ष पहायला मिळेल.

लसीकरण केंद्रावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे यंत्रणा राबवण्यात अपयशी ठरले आहेत.याबाबत अनेक पक्ष,संघटना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे तक्रार करणार करून नागरिकांची गैरसोय,भोंगळ कारभार दूर करण्याची मागणी करणार आहेत.

राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडे पाठवू – अशोक चव्हाण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या