22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeसोलापूरनिकृृृृष्ट अन्नामुळे सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेलच्या मुलींना विषबाधा

निकृृृृष्ट अन्नामुळे सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेलच्या मुलींना विषबाधा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मंगळवारी रात्री जेवणातून छोलेची भाजी खाल्याने पोट दुखून उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने सिद्धेश्वर गर्ल्स होस्टेलच्या १४ महाविद्यालयीन तरुणींना बुधवारी सकाळी ७ वाजता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीस तपासात मुलींचे जबाब घेताना मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे गार्‍हाणे मांडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळेच विषबाधा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अन्न औषध प्रशासनाच्या पथकास पाचारण करून किचनमधील अन्नाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले. आता तपासणी अहवालानंतच काय ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान, घटनेमुळे पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात आली. मेस चालविणारी महिला आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.

श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित वुमेन्स पॉलिटेक्निक, वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज येथील चौदा विद्यार्थिनींना अन्न किंवा पाण्यातून बाधा झाल्याने त्यांना बुधवारी पहाटे चारपासून उलट्या-जुलाब सुरू झाले. विषबाधा झालेल्या सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास आहेत. त्यांना भोजनातून किंवा पाण्यातून प्रादुर्भाव झाली असावा असे सांगण्यात येत आहे. त्रास होऊ लागल्यामुळे त्यातील आठ विद्यार्थिनींना एस.टी. स्टँडजवळील सिध्देश्वर हॉस्पिटल येथे आणि सहा विद्यार्थिनींना भवानी पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व बाधित विद्यार्थिनींची प्रकृती पूर्ववत होत असल्याचे सांगण्यात आले मंगळवारी मुलींनी रात्री भोजनामध्ये छोलेची भाजी खाल्याचे सांगितले. रात्री अडीचनंतर पोट दुखू लागले आणि पहाटेपासून उलट्या-जुलाब होऊ लागल्याचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने त्यांना दोन रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.

सिध्देश्वर चुमन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एकूण ४५ विद्यार्थिनी राहतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री होस्टेलमधील सर्व मुली जेवण करून झोपल्या. मात्र सकाळी उठल्यानंतर मुलींना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. ज्या मुलींनी रात्री जेवणात छोलेची भाजी खाल्ली होती, असे त्याच्याशी संवाद साधताना माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता समर्थ हॉस्पिटल येथून जोडभावी पोलिसांना फोनद्वारे सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निकच्या गर्ल्स होस्टेलमधील ७ मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची खबर मिळाली. लागलीच एक टीम हॉस्पिटलकडे रवाना केली आणि जेथे घटना घडली त्या होस्टेलवर जाऊन पाहणी केली. तेथून आणखी ७ मुलींना सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्याचे समजले. त्यानुसार तेथेही फौजदार ताकभाते आणि सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांचे पथक जबाब घेण्यासाठी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली.

उपचारास दाखल असलेल्या विद्यार्थिनी आणि पालकांना कोणताही अधिक त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आपण स्वतः परगावी असल्याने घटनास्थळी समक्ष येऊ शकलो नाही. परंतु परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत असे
श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगीतले. मुलींना शिक्षणासाठी होस्टेलमध्ये ठेवले. त्यांच्यावर भरवसा ठेवल्यानंतर जर असे प्रकार होऊ लागले तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा असा सवाल पालकांमधून होऊ लागला आहे. पोलिसांच्या जबाबामध्ये मुलींनी निकृष्ट आहार मिळत असल्याची तक्रार केल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या